रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,रत्नागिरी या बँकेची स्थापना २४ मे १९५७ रोजी झाली. पण बँकेच्या कामाची सुरवात ख-या अर्थाने ५ डिसेंबर १९५७ रोजी झाली. बँकेचा उद्घाटन कार्यक्रम दि. ५-१२-१९५७ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष कै. रामलाल सुरैय्या हे उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा बँकेची स्थापना रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होण्यापूर्वी झालेली होती. विभाजनानंतर रत्नागिरी जिल्ह्याचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग असे दोन जिल्हे निर्माण झाले. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी या बँकेची स्थापना १ जुलै १९८३ रोजी करण्यात आली. बँकेचा नोंदणी क्रमांक आरटीजी/बीएनके/१४२७/दि. १ जुलै १९८३ असा आहे. तसेच रिझर्व बँकेकडून बँकिंग व्यवसाय करण्यासाठी आरपीसीडी /बीएमओ/६९- सी/दि. ७ जुलै १९९५ ने मान्यता मिळाली होती. हा परवाना नुतनीकरण होऊन आरपीसीडी (एमआरओ )/१२५७/१८-०१-३० सन २०११-१२ दि. २० डिसेंबर २०११ ने मान्यता मिळाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ९ तालुके असून मंडणगड,दापोली,खेड , गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी,लांजा,व राजापूर या तालुक्यांमध्ये बँकेच्या कामाचा विस्तार झाला आहे. तसेच रत्नागिरी जिल्ह्याला सह्याद्रीच्या पर्वत रांगांमुळे व त्यातील विविध औषधी वनस्पती व शोभिवंत झाडांमुळे निसर्गरम्य असे सुंदर रूप प्रदान झाले आहे. या ठिकाणी मोठा पाऊस होत असल्याने धबधबे पाहण्यासाठी लोक आकर्षित होत आहेत. हापूस आंबा,फणस,काजू, सुपारी, नारळ,कोकम इ. फळ पिके, तसेच जंगली फळ पिके यांना "कोकणी मेवा" या नांवाने ओळखले जाते. हा कोकणी मेवा रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र आढळून येतो. तसेच कोकणातील प्रमुख पिके भात व नाचणी ही असून काही ठिकाणी छोटया प्रमाणात भाजी-पाला व इतर पिके घेतली जातात. मासेमारी व्यवसाय कोकण किनारपट्टी वरील प्रमुख व्यवसाय मानला जातो. कोकणात मच्छिमार सहकारी संस्थाचे जाळे पसरले असून त्यांच्या माध्यमातून मच्छिमार व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा केला जातो. या सहकारी संस्थाना रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत वित्त पुरवठा केला जातो. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंबा, काजू व इतर स्थानिक फळपिकांवर प्रक्रिया करणारी युनिट आहेत. रत्नागिरी जिल्ह्याच्या अर्थकारणामध्ये शेती आधारीत उद्योगांचा मोलाचा वाटा आहे. स्वातंत्र्यानंतर जिल्ह्यातील शेतक-यांचा आर्थिक स्तर उंचावावा,गरजवंतांना साहाय्य मिळावे या उद्देशाने बँकेची स्थापना झाली असून रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पिक कर्जाकरीता लहान,मध्यम व मोठे शेतकरी यांना वित्त पुरवठा करते. तसेच जमीन सुधारणा, शेती व शेतीपूरक व्यवसायाकरीता अर्थसहाय्य करते. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत मोठ्या प्रमाणात कर्मचारी सहकारी पतसंस्था, गृहनिर्माण सोसायटी, मजूर सहकारी संस्था, औद्योगिक सहकारी संस्था, स्वयंसहाय्यता बचत गट यांनाही वित्तपुरवठा केला जातो. तसेच गरीबी निर्मुलनाकरीता शासकीय योजना बँकेमार्फत राबविल्या जातात. महाराष्ट्र राज्यात सहकारामध्ये बँक अतिशय उत्कृष्ट कामकाज करत असून नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करीत आहे. यामध्ये व्यवस्थापन,बँकिंग कार्यपद्धती याबाबत अंतर्भाव आहे. सद्यस्थितीत बँकेचा नक्त एन. पी. ए. ०% असून सी. आर. ए. आर. रेशो आदर्शवत असून अल्प कालावधीत रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. रत्नागिरी राज्यातील नंबर एकची बँक म्हणून ओळखली जाईल. रत्नागिरी जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा बँकेची सर्वसाधारण माहिती :- १) एकूण लोकसंख्या - १६,१५,०६९ २) शेतकरी - ३,३७,४२१ ३) आर.डी.सी.सी बँक सभासद - १९८६ ४) वैयक्तिक सभासद - २३ ५) प्राथमिक शेती सहकारी संस्था - ४०९ ६) दुग्ध सहकारी संस्था - १३९ ७) कुक्कुट, शेळी- मेंढी, वराह जनावर पैदास सहकारी संस्था - १२५ ८) मच्छीमारी सहकारी संस्था - ९२ ९) पगारदार नोकरदार सहकारी संस्था - ७८ १०) नागरी सहकारी संस्था / अर्बन सहकारी संस्था - २४५ ११) खरेदी-विक्री / प्रक्रिया / ग्राहक सहकारी संस्था - ९२ १२) औद्योगिक सहकारी संस्था - ११८ १३) गृहनिर्माण सहकारी संस्था - १६० १४) फेडरल - ८ १५) मजूर वाहतूक जिल्हा देखरेख मंडळ /स्वयंरोजगार , बेरोजगार - २६० १६) इतर सहकारी - २३७
|
|
> Home | > Quality Policy | > Characteristics of RDCC Bank | > Career | > Media | > Holidays |
> Contact | > Privacy & Policy |